न्यायासाठी देवच अवतरले कार्यालयात, अधिकारी थक्क!
दौसा : राजकारण, आंदोलन आणि न्यायासाठी लोक नेहमी प्रशासनाकडे धाव घेतात पण यावेळी तर स्वतः भगवान सियारामच सिंहासनावर बसून कलेक्टरसमोर हजर झाले!
होय, दौसा जिल्ह्यातील गादरवाडा ब्राह्मणान गावातल्या पुजाऱ्यांनी मंदिराच्या माफी जमिनीवरील रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ सीतारामजींची मूर्ती घेऊन थेट कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला. पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले, तर प्रशासनही अवाक् झालं.
पुजारी लल्लूराम शर्मा यांनी सांगितले की, मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता स्थानिकांनी पूर्णपणे अडवला आहे. या रस्त्यावरून जाण्यावाचून मंदिराची सेवा व पूजा-अर्चा करणं अशक्य झालं आहे. इतकेच नाही, तर पुजाऱ्यांचा उदरनिर्वाहही या मंदिरावर अवलंबून आहे.
“सरपंच, तहसीलदार, एसडीएम, कलेक्टर, मुख्यमंत्री… सगळ्यांना पत्र दिलं, पण कुणीच लक्ष दिलं नाही. आता देवालाच न्याय मागायला आणावं लागलं,” असं भावनिक आवाहन पुजाऱ्यांनी जनसुनवाईदरम्यान केलं.
ग्रामस्थांनी कलेक्टर देवेंद्र कुमार यांना ज्ञापन देत म्हटलं की, जर प्रशासनाने या मार्गावरील अडथळे हटवले नाहीत, तर आंदोलन करत आत्मदहनाचा मार्ग पत्करावा लागेल.
दरम्यान, कलेक्टर देवेंद्र कुमार यांनी “या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल” असं आश्वासन दिलं आहे. मात्र या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि धार्मिक संस्थांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
Siyaram sat in front of the collector!
P
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response